news
clock
गहुंजे स्टेडियमला अजितदादांचे नाव द्यावे, मोरेश्वर भोंडवे  यांची मागणी

गहुंजे स्टेडियमला अजितदादांचे नाव द्यावे, मोरेश्वर भोंडवे यांची मागणी

गहुंजे स्टेडियमला अजितदादांचे नाव द्यावे, मोरेश्वर भोंडवे  यांची मागणी 

पिंपरी, ता. ६ - गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मोरेश्वर भोंडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.

निवेदनामध्ये भोंडवे यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासात मोठे योगदान दिले आहे  गहुंजे येथे उभारण्यात आलेले एमसीए स्टेडियम है आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रीडासंकुल आहे, त्याच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे योगदान लक्षात घेता एमसीए स्टेडियमला अजितदादांना नाव देणे ही त्यांच्या कार्याला योग्य अशी आदरांजली ठरेल.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करुन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories