बांधकाम साहित्याच्या खरेदीत ८ लाखांची फसवणूक, बावधन येथील प्रकार 

पिंपरी, ता. १९ - बांधकाम साहित्याच्या खरेदीमध्ये चुकीचा धनादेश देऊन बावधन येथील ३८ वर्षीय तरुणाची ८ लाख २९ हजार ४५२/- रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार बावधन येथे ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. १८) बावधन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, प्रशांत प्रकाश कदम (वय ३८ वर्षे, नोकरी, रा. बावधन) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीच्या घटनेमध्ये मे. यशश्री स्टीलचे मालाक

१) जावेद तांबोळी, (रा. ससाणेनगर, हडपसर) व २) एक महिला आरोपी आहेत. आरोपींकडे फिर्यादी कदम यांनी त्यांच्या कंपनीच्या बांधकाम साईटसाठी  सुमारे २० टन स्टीलची ऑर्डर दिली होती. त्याची एकूण किमंत (जीएसटी सहीत) १० लाख ६६ हजार १८९/- रुपये होती.  यशश्री स्टील यांनी वेळेत स्टील सप्लाय होईल असे सांगून फिर्यादी कदम यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून सर्व १० लाख ६६ हजार १८९/- रुपये घेतले.  त्यानंतर २० टन स्टीलपैकी फक्त ५ टन स्टील कंपनीला पाठविले. उर्वरित स्टील १५ टन स्टिलची किमंत ८ लाख २९ हजार ४५२/- रुपये इतकी आहे. त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी आज देतो उद्या देतो, चार दिवस जाऊ द्या, तुमचे पैसे परत देतो अशी वेगवेगळी कारणे सांगितले. नंतर, वारंवार पाठपुरावा केला असता ८ लाख २९ हजार ४५२/- रुपयांचा धनादेश दिला, मात्र हा धनादेश परत आल्याने फिर्यादी कदम यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३१६ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केली नाही. पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance