जिवंत काडतूसासह पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, ता. ६ - बेकायदेशीरपणे ५१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या २० वर्षीय युवकाला गुन्हेशाखा युनिट - ४ च्या पोलिसांनी मौजे आंबेठाण-ता. खेड येथून बुधवारी (ता. ४) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ४) मौजे आंबेठाण येथे बोरदारकडे जाणाऱ्या रस्त्यालगत
विकी दिपक चव्हाण (वय २० वर्षे, रा. आंबेठाण) याने ५०,०००/- रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व १,०००/-रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस विनापरवाना जवळ बाळगले होते.
पोलिसांनी आरोपी अटक करुन त्याच्याविरोधात उत्तर महाळुंगे एमआयडीसी ८७/०२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महा पोलीस कायदा अधिनियम ३७ (१) (३) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------