news
clock
तळेगाव दाभाडे येथे मारहाण, एकावर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे येथे मारहाण, एकावर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे येथे मारहाण, एकावर गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २६ - तळेगाव दाभाडे येथील  येथील डी.ओ.डी. डेपो परिसरातील कॅन्टीनमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी, २५ फेब्रुवारीला सकाळी घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास डी.ओ.डी. डेपो येथील कॅन्टीनमध्ये घडली. फिर्यादी योगेश भाऊ मुंगसे (वय ४४, रा. आळंदी केळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपी राहुल भेगडे (रा. तळेगाव दाभाडे) यास मागील दिवसाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्याचा राग अनावर झाला. त्यातून आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली व हाताने मारहाण केली. तसेच हातातील कड्याने फिर्यादी यांच्या उजव्या कानावर मारून त्यांना साधी दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार तोडकर करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories