पिंपरी-चिंचवडमधील कथक नर्तकांच्या सादरीकरणाला परदेशातील रसिकांची उत्स्फूर्त दाद
Feb 06 2026
68
पिंपरी-चिंचवडमधील कथक नर्तकांच्या सादरीकरणाला परदेशातील रसिकांची उत्स्फूर्त दाद
पिंपरी, ता. ६ - पिंपरी-चिंचवड येथील कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या शिष्यांनी बँकॉकमध्ये सादर केलेल्या कथ्थक नृत्याला परदेशी रसिकांची उत्स्फूर्त दाद दिली.
२९ जानेवारीला बॅंकॉकमील भारतीय दुतावासातील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला एम्बेसी ऑफ इंडियाचे संचालक डॉ. चैतन्य प्रकाश योगी उपस्थित होते. संतोष सिंग, संतोष कुमार, विश्व हिंदू परिषद, थायलंडच्या अध्यक्ष वैशाली उरूमकर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमात डॉ. कपोते यांच्यासह निकिता मोघे, भावना सामंत, पद्मिनी सोनावणे, समृद्धी कुलकर्णी, प्रेरणा भिंगारे, अनुष्का सामंत, अपूर्वा नीला, हर्षदा केदार या कलाकारांनी कथ्थक नृत्यातील विविध अंगांचे प्रभावी सादरीकरण केले. गणेश वंदना, पं. बिरजू महाराज यांचे भजन, तोडे, परण, ठुमरी, तराना, रामभजन, होरी आदी कथ्थक नृत्यप्रकारांनी कार्यक्रमात रंगत आणली.
-------------------------------------------------------------------------------------------