news
clock
पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटूंची ४५० किलोमीटरची सायकल मोहिम यशस्वी

पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटूंची ४५० किलोमीटरची सायकल मोहिम यशस्वी

पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटूंची ४५० किलोमीटरची सायकल मोहिम यशस्वी

पिंपरी, ता. ९ - तरुणाईला आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेण्याच्या उद्देशाने इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सात सायकलपटूंनी पुणे ते शेगाव ही ४५० किमी लांब पल्ल्याची मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. नाशिक फाटा येथून या मोहिमेला सुरवात झाली. 

सलग तीन दिवस  पुणे-वाघोली-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर-सिंदखेड राजा-चिखली व खामगाव मार्गे शेगाव असा सायकलप्रवास या सायकलपटूंनी केला. शेगाव येथे पोहोचल्यानंतर संत गजानन महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. या मोहिमेत गिरीराज उमरीकर, अजित पाटील, श्रीकांत चौधरी, प्रशांत तायडे, सुशील मोरे, अनुप कोहळे आणि प्रतीक पवार यांनी सहभाग घेतला. 

----------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories