news
clock
पुणे पोलिसांकडून नऊ सराईत गुन्हेगार तडीपार,  परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांचा आदेश

पुणे पोलिसांकडून नऊ सराईत गुन्हेगार तडीपार, परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांचा आदेश

पुणे पोलिसांकडून नऊ सराईत गुन्हेगार तडीपार,  परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांचा आदेश 

पिंपरी, ता. २७ - पुण्यातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश परिमंडळ - २ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये जालिंदर मसा मोरे (वय-४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनील ठाकर (वय-२६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय-२३, रा. बिबवेवाडी), राजू महादेव डेंगळे (वय-२२, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय-२१), कृष्णा बबन लोखंडे (वय-२४), आर्यन बापू बेलदरे (वय-२४, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय-३३, रा. मार्केटयार्ड) आणि साहिल भीमा अष्टगे (वय-२०, रा. मार्केटयार्ड) यांचा समावेश आहे.

 शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. या आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे आणि मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत होती. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधितांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories