news
clock
वेश्या व्यवासाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

वेश्या व्यवासाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

वेश्या व्यवासाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा 

पिंपरी, ता. ५ - वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने हावभाव व शब्दोच्चार करणाऱ्या दोन महिलांविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ८ प्रमाणे बुधवारी (ता. ४) दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

 दिघी परिसरातील योगीराज चौकाकडून चाकण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी कमानीच्या जवळील पत्र्याच्या कंपाउडजवळ पदपथावर दोन महिला सायंकाळी साडेसातच्या सुमारास वेश्या व्यवसायासाठी थांबल्याचे आढळले. या महिला लैंगिक खाणाखुणा व वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार करत होत्या. त्यामुळे  सार्वजनिक ठिकाणी येणाजाणाऱ्या लोकांना अडथळा होत होता व  सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत होता.  पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------------


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories