news
clock

सायबर फसवणूक करणारी टोळी गजाआड, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी 

पिंपरी, ता. १७ -  शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून एका व्यक्तिची तब्बल ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलिसांत दाखल होता. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मागर्दर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरु होता. फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गजाआड केले आहे. 

सदर गुन्हयात या अगोदर २ आरोपींना अटक करण्यात आली असुन सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. फसवणुक झाले रक्कम पैकी १८,००,०००/- रुपये होल्ड करण्यात आले आहेत. दाखल गुन्हयात आरोपींनी येस बँक अकाऊंटमध्ये गुन्हयातील फसवणुकीची ८,२५,०००/- रुपये रक्कम घेतली होती. सदरचे Current Account हे Veltora Technologies Private या नावाने मोनिल अतुलकुमार मोदी रा. मेहसाणा गुजरात याचे नावाने असल्याची माहीती प्राप्त झाली होती. तांत्रिक विश्लेषणव्दारे नमुद बँक खातेधारक हा वेगवेगळ्या राज्यात फिरत असल्यामुळे सापडत नव्हता.

दिनांक १२ मार्चला सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी यांना यातील आरोपी मोनिल अतुलकुमार मोदी हा लोणावळा येथे येणार असल्याची माहीती मिळाली होती. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी वरीष्ठांची परवानगी घेऊन पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक यांना रवाना करण्यात आले होते. त्यांनी लोणावळा येथे जाऊन तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेतला असता तेथील गेस्ट हाऊसमध्ये तो असल्याची माहीती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक यांनी ४०० ते ५०० व्हिलामधुन आरोपी मोनिल अतुलकुमार मोदी याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या सोबत ३ व्यक्ती सापडल्या आणि त्यांच्याकडे १ लॅपटॉप, ७मोबाईल फोन, १४ डेबिट कार्ड, २ वेब कॅमेरे, ५ बँक अकाऊंट किट, १ रबरी स्टॅम्प सापडले. ही टोळी सायबर  फसवणुकीची रक्कम उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँकेचे बँक अकाऊंटमध्ये  वर्ग करत असल्याचे आढळले. आरोपी विविध बॅंकांचे खाते काढून ते सायबर फसवणूकीसाठी वापरत होते.

 त्यांच्याकडे अधिकचा तपास केला असता त्यांनी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अकाऊंट नंबर यावर १ कोटी रुपयापेक्षा जास्त सायबर फसवणुकीची रक्कम प्राप्त केली असल्याचे समोर आले तसेच त्यांनी वेगवेगळ्या राज्यात फिरुन अशाच प्रकारचे बँक अकाऊंट मध्ये सायबर फसवणुकीची रक्कम प्राप्त केल्याचे आढळले. सदर गुन्हयातील येस बँक अकाऊंटमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम प्राप्त केली असल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपी मोनिल मोदी यास गेस्ट हाऊसमधील एका रुमध्ये वेब कॅमेऱ्याच्या निगरानी खाली ठेऊन त्याच्या उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक खात्यात सायबर फसवणुकीची रक्कम वर्ग केली जात होती. नमुद फसवणुकीची रक्कम तात्काळ आरोपी रवि जाट (वय २१ वर्ष) व रुद्रपाल चौहान (वय २२ वर्षे) हे इंटरनेट बँकिंगव्दारे इतर खात्यामध्ये वर्ग करीत होते.  सर्व आरोपीवर हंश वर्मा (वय १९ वर्षे) हा निगराणी ठेऊन त्यांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याचे काम करीत होता.

अटक आरोपींची नावे - 

१) मोनिल अतुलकुमार मोदी वय २४ वर्षे रा. मेहसाणा, गुजरात.

२) रवि गोकल प्रसाद जाट वय २१ वर्षे, रा. जिल्हा राजगड राज्य- मध्यप्रदेश.

३) रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान वय २२ वर्षे, रा जि खाडवा राज्य मध्यप्रदेश.

४) हंश कैलास वर्मा वय १९ वर्षे रा. बोरीवली ईस्ट मुंबई.

सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, डॉ. शशिकांत महावरक (सह पोलीस आयुक्त), सारंग आव्हाड (अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप आयुक्त गुन्हे), डॉ. विशाल हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-१) यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण,  रोहीत डोळस,  प्रकाश कातकाडे व विदया पाटील, पोलीस अंमलदार दिपक भोसले, हेमंत खरात, विनायक म्हसकर, सुभाष पाटील, किरण देवकर, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, प्रविण शेळंकदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नितेश बिचेवार, दिपाली चव्हाण  यांच्या पथकाने केली आहे.  आरोपी विरोधात न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी रिमांड मिळवून देण्यास मदत केली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories