ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंमध्ये ५१.७८ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १७ - शिवराजनगर-रहाटणी येथील इसमाची ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंगमध्ये मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. ही फसवणूक १ सप्टेंबर २०२५ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडली आहे.
याबाबत एका इसमाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी इसमाला आरोपी नवीशा सन्याम हिने आणि तिच्या अनोळखी सहकाऱ्यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅड केले व ट्रेडिंग साईटची माहिती दिली. फिर्यादीला जास्त परतावा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
गुंतवणुकीचे पैसे अनेक बँक खात्यांवर पाठवण्यास भाग पाडले. फिर्यादीला कोणताही परतावा न देता फिर्यादीची एकूण ५१ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केली.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) सह कलम ६६ (क),६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.