news
clock
नेपाळला सहलीला नेण्याचे आमिष दाखवून ७३ हजारांची फसवणूक

नेपाळला सहलीला नेण्याचे आमिष दाखवून ७३ हजारांची फसवणूक

नेपाळला सहलीला नेण्याचे आमिष दाखवून ७३ हजारांची फसवणूक 

पिंपरी, ता. १९ - स्वतःची टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी असल्याचे भासवत व नेपाळ येथे सहलीला नेण्याचे आमिष दाखवून बावधन येथील इसमाची ७३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. या फेब्रुवारीमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपी विरोधात बुधवारी (ता. १८) बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, फसवणूक झालेल्या इसमाने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महेश फालक नावाच्या आरोपीने टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे असे सांगून त्यांना पशुपतीनाथ, नेपाळ भेट देण्यासाठी ट्रॅव्हल सुविधा देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादीने आरोपीच्या सांगितल्या माहितीनुसार ७३,५००/- रुपये ट्रान्सफर केले, परंतु नंतर कोणतीही सेवा दिली नाही. यावरून आरोपीने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपीविरोधात  भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१९ (२), ३१६ (२) व माहिती तंत्रज्ञान आधि कलम ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories