news
clock
शिवजयंतीनिमित्त चिंचवडमध्ये होणार संगीतमय कथाकथन ....'प्रतापगड पर्व'

शिवजयंतीनिमित्त चिंचवडमध्ये होणार संगीतमय कथाकथन ....'प्रतापगड पर्व'

शिवजयंतीनिमित्त चिंचवडमध्ये होणार संगीतमय कथाकथन ....'प्रतापगड पर्व' 

पिंपरी, ता. १६ - शिवजयंतीनिमित्त 'प्रतापगड पर्व' हा प्रेरणादायी संगीतमय कथाकथनाचा कार्यक्रम २३ फेब्रुवारीला चिंचवड येथे आयोजित केला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी चिंचवड महानगर यांच्यातर्फे हा कार्यक्रम होत आहे. 

चिंचवडगावातील द एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलमधील ऑडिटोरियममध्ये सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल.  यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा मागोवा संगीतमय कथाकथनाच्या माध्यमातून  घेतला जाणार आहे. प्रतापगडाच्या संग्रामाचे प्रभावी सादरीकरण या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमासाछी पूर्वनोंदणी केल्यानंतर प्रवेश दिला जाईल. नागरीकांनी आणि तरुणाईने छत्रपती शिवरायांचे पराक्रम समजून घेण्यासाठी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories