news
clock
भोसरीमध्ये होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा, १८ फेब्रुवारीला ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण

भोसरीमध्ये होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा, १८ फेब्रुवारीला ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण

भोसरीमध्ये होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा, १८ फेब्रुवारीला ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण

पिंपरी, ता. १७ - भोसरी गावठाणात यंदा 'एक गाव, एक शिवजयंती' या संकल्पनेतून यंदा भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे १८ व १९ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. दोन दिवस विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत.

बुधवारी (ता. १८) रात्री ८ वाजता भोसरीतील उड्डाणपुलाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात  ढोल-ताशा पथकांचे भव्य सादरीकरण होईल आणि या चैतन्यदायी व दिमाखदार वादनातून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. 

 फुगे-माने तालीम, लांडगे लिंबाची तालीम, गडकोट सेवेकरी, पठारे-लांडगे तालीम, कृपाताई फाउंडेशन ट्रस्ट, हिंदवी स्वराज्य ग्रुप, युवा प्रतिष्ठान, समस्त गव्हाणे तालीम, मधले फुगे तालीम, लोंढे तालीम, भवानी तालीम, छावा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव, श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सव, भैरवनाथ कबड्डी संघ, भैरवनाथ कबड्डी संस्था तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती व भोसरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा शिवजन्मसोहळा आयोजित केला आहे. 

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories