संस्कार भारतीतर्फे 'अभिव्यक्ती कला महोत्सव', येत्या शनिवार-रविवारी  ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजन

संस्कार भारतीतर्फे 'अभिव्यक्ती कला महोत्सव', येत्या शनिवार-रविवारी ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजन

संस्कार भारतीतर्फे 'अभिव्यक्ती कला महोत्सव', येत्या शनिवार-रविवारी  ग. दि. माडगूळकर सभागृहात आयोजन                 

पिंपरी, ता. २३ - संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीतर्फे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने येत्या अभिव्यक्ती महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात हा महोत्सव होणार आहे. 

शनिवारी महोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे ,प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे, कला व क्रिडा सभापती  कैलास कुटे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, संस्कार भारती महाराष्ट्र प्रांताचे महामंत्री सतीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता. २५)  पंडित कैवल्य कुमार गुरव, पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, पंडिता श्रध्दा हर्डीकर, ओजसजी हिरानी हे प्रसिद्ध  कलाकार आपली कला सादर करतील. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) डॉ. भावार्थ देखणे यांचे बहुरूपी भारुड, संस्कार भारती नाट्यविधेचा आठवणींचा गाव, महाराष्ट्राची लोकधारा, संगीत विधेतर्फ कै. आशा भोसले यांना स्वरांजली, तसेच प्रसिद्ध नृत्यांगना डॉ, संध्या पुरेचा व सहकारी यांचे भरतनाट्यम नृत्य , पंडित सुधाकर चव्हाण गायन, त्या तिघी आणि प्रसिद्ध बासरी वादक पद्मश्री  पंडित रोणू मुजूमदार यांचे बासरी वादन असे अनेक सुरेल कार्यक्रम अनुभवायला मिळतील. या शिवाय स्थानिक कलाकारांचा नृत्य पंढरी हा कार्यक्रम होणार आहे. सदर महोत्सव नागरीकांसाठी विनामूल्य असल्याने, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा असे विनम्र आवाहन संस्कार भारती पश्चिम प्रांत यांच्याकडून करण्यात आले आहे.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories