आकुर्डी | 17 सप्टेंबर 2026 : कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्री विठ्ठल मंदिरासमोर, संत तुकाराम महाराज पालखी तळ, आकुर्डी येथे ही स्पर्धा होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रमेश भोरकर आणि सुनील मोरे यांनी केले आहे.
या रक्तदान स्पर्धेत सर्वाधिक कार्यकर्ते रक्तदान करतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा सामाजिक संस्थेला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये रोख पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे.
याशिवाय रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले आहे. या लकी ड्रॉमधील विजेत्यांना एक सायकल आणि एक ग्रॅम सोन्याचे नाणे अशी बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘रक्तदान हेच खरे मानवतेचे दान’ हा सामाजिक संदेश घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होण्यास हातभार लावण्यासोबतच युवक आणि सामाजिक संस्थांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.
रक्तदान स्पर्धा रविवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री विठ्ठल मंदिरासमोर, संत तुकाराम महाराज पालखी तळ, आकुर्डी येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी इखलास सय्यद – 9552345429 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आपुलकी मित्र मंडळाने केले आहे.