आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील १२ मीटर रुंदीचा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला

आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील १२ मीटर रुंदीचा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला

आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील १२ मीटर रुंदीचा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला

पिंपरी, ता. १६ - वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याने आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुरुस्तीसाठी डिसेंबर २०२५ पासून बंद करण्यात आला होता. आता पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ९ मार्च २०२६ रोजी हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असल्याचे माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने दिली आहे. 

वाहतूक शाखेने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, श्री क्षेत्र देहू-आळंदी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अंर्तगत बांधण्यात आलेला आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील १२ मी रुंदीचा चहोली बुद्रुक रस्ता व चऱ्होली खुर्द रस्ता जोडणारा श्रीमंत सरसेनापती कहदेराव दाभाडे पुल दुरुस्ती बंद होता. 

सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्याने हा पूल ९ मार्चपासून  सर्व प्रकारच्या वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनचालकांनी या पुलाचा वापर करुन इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने केले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories