news
clock

पोलिस भरती लेखी परीक्षेत केली 'कॉपी', युवतीवर गुन्हा दाखल  

पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड पोलिस भरतीच्या रविवारी (ता. १५) झालेल्या लेखी परीक्षेमध्ये एका युवतीने कॉपी केल्याचे उघड झाले. ताथवडे येथील श्री बालाजी युनिर्व्हसिटीमध्ये तिचे परीक्षा केंद्र होते. काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेल्या चिठ्ठ्या तिने जीन्स पॅन्टच्या खिशात लपवल्या होत्या आणि कपड्यांवरही तिने उत्तरे लिहून आणली होती. या गैरवर्तनाबद्दल युवतीवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस शिपाई अर्चना नवनाथ सस्ते यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस भरती २०२४-२५ लेखी परिक्षे दरम्यान परीक्षा परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी केलेल्या तपासणीत महिला उमेदवाराने कॉपीच्या चिठ्ठया सोबत आणल्या होत्या. या चिठ्ठ्या तिने परीधान केलेल्या जीन्स पॅन्टच्या खिश्यात सापडल्या. तसेच तिने जीन्स पॅन्टवर व टॉपवरही उत्तरे लिहिली होती. 

या गैरवर्तनाबद्दल सोमवारी (ता. १६)  या युवतीवर महाराष्ट्र स्पर्धा परिक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम - २०२४ चे कलम ३(x) r/w ११(१) प्रमाणे वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories