आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचा बुधवारी रात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून
May 14 2026
18
आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचा बुधवारी रात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून
पिंपरी, ता. १४ - आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांचा काल, बुधवारी (ता. १) रात्री अज्ञात व्यक्तिंनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला आहे. मोशी परिसरातील युवराज रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी काल रात्री नऊ वाजता दरम्यान अनिल मोरे यांच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि ते घटनास्थळावरुन पसार झाले.
अज्ञात आरोपींनी अनिल मोरे यांचा हल्ला करुन खून का केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या त्यांच्या मृतदेहावर वाय सी एम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आला आहे. जोपर्यंत अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना पोलीस बेड्या ठोकत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा इशारा पिंपरी-चिंचवड शहरातील आरपीआय कार्यकर्त्यांनी दिला आहे.
आरपीआय कामगार आघाडी पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष वैभव रोकडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, '' बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अनिल मोरे यांच्यावर अज्ञातांना प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर १२ तास उलटून गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नाही हे दुर्देव आहे. जोवर आरोपीला पकडले जात नाही तोवर अनिलभाऊंचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली ते हॉटेल रात्री साडेनऊ ते दोन वाजेपर्यंत खुले होते. पोलिस तिथे असूनही त्यांनी हॉटेल बंद केले नाही. आम्ही जाऊन सांगितले तेव्हा हॉटेल बंद केले. '' आरोपीला अटक झाली नाही तर खूप मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा रोकडे यांनी दिला आहे.
- वैभव रोकडे, Vaibhav Rokde, पोलीस, Police, आंदोलन, Protest
- अज्ञात आरोपी, Unknown Accused, हल्ला, Attack, मृतदेह, Dead Body, वाय सी एम हॉस्पिटल, YCM Hospital, शवविच्छेदन, Postmortem,
- पिंपरी, Pimpri, मोशी परिसर, Moshi Area, युवराज रेस्टॉरंट अँड बार, Yuvraj Restaurant & Bar,
- अध्यक्ष, President, अनिल मोरे, Anil More, खून, Murder, धारदार शस्त्र, Sharp Weapon,
- आरपीआय कामगार आघाडी, RPI Workers Front, महाराष्ट्र, Maharashtra,