news
clock
भरधाव कारच्या धडकेत पिकअप टेम्पो पलटला, कारचालक अटकेत

भरधाव कारच्या धडकेत पिकअप टेम्पो पलटला, कारचालक अटकेत

भरधाव कारच्या धडकेत पिकअप टेम्पो पलटला, कारचालक अटकेत

पिंपरी, ता. १८ - भरधाव कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून पिकअप टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने पिकअप टेम्पो पलटी होऊन चालक जखमी झाला व टेम्पोतील मालाचे नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी (ता. १६) बावधन परिसरात रात्री घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पिकअप चालक निलेश अरविंद गायकवाड (वय ३९ वर्षे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी कारचालक स्वप्नील ऊर्फ रोशन बाळासाहेब पिंगळे (वय २६ वर्षे, सध्या रा. कोथरुड) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश हे १६ मार्चला बावधन परिसरातून पिकअपमधून कलिंगडाचा माल घेऊन जात होते. तेव्हा मद्यधुंद कारचालकाने कार भरधाव वेगात चालवत निलेश यांच्या पिकअपला पाठीमागून जोरात धडक दिल्याने पिकअप टेम्पो पलटी झाला व कलिंगडाचे नुकसान झाले. पिकअपमध्ये मागे बसलेले चंद्रकांत मोरे यांच्या डोक्याला व मानेला मार लागून ते गंभीर जखमी झाले. फिर्यादी निलेश व विकास किरवे हे किरकोळ जखमी झाले. 

आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात दिघी पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories