एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई, ३ हजार ९३८ ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक
Feb 28 2026
31
एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई, ३ हजार ९३८ ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक
पिंपरी, ता. २८ - भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी (ता. २६) कारवाई करत सुमारे ३ हजार ९३८ ग्रॅम इतका, २ लाख ७ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गांजा बाळगणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी शुक्रवारी (ता. २७) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुरज रवि सिंग (रा. म्हाळुंगे) व रणजित कुमार सिंग (रा. निघोजे) अशी आहेत. आरोपींकडून ३९३८ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन, काळ्या रंगाची बॅग व प्लास्टिक पिशव्यांचा पुडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी हा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या जवळ बाळगला होता.
चौकशीत हा गांजा ओरिसा येथून विक्रीसाठी आणल्याचे आरोपींनी सांगितले. याप्रकरणी एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) व २९ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रतिक संभाजी कवडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि तळेकर करीत आहेत.