भोसरी एमआयडीसीत फटाके विक्रेत्याला मारहाण; दात पाडला, सहा आरोपी अटकेत

भोसरी एमआयडीसीत फटाके विक्रेत्याला मारहाण; दात पाडला, सहा आरोपी अटकेत

भोसरी | १० नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी परिसरात जुन्या वादाच्या रागातून योगशिक्षक आणि त्यांच्या भावावर सहा जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा एक दात पडला असून, मोबाईलचेही नुकसान करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाही आरोपी अटकेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अमर अधिक साळुंखे (वय २५ वर्षे, भोसरी एमआयडीसी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात प्रतिक बसवराज हळकवडे (वय १८ वर्षे, राहणार खंडेवस्ती, भोसरी), ओम बाबू जगताप (वय १९ वर्षे, राहणार मोहननगर, चिंचवड), समीर उत्तम गवळी (वय २० वर्षे, राहणार ईएसआय हॉस्पिटलजवळ, मोहननगर, चिंचवड), सुमित कमलाकर दाभाडे (वय २४ वर्षे, राहणार सेक्टर क्रमांक १२, पिंपरी), प्रदीप विठ्ठल कळसे (वय २० वर्षे, राहणार विद्यानगर, चिंचवड) आणि सुरज कमलाकर दाभाडे (वय २० वर्षे, राहणार खंडेवस्ती, भोसरी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील सेक्टर क्रमांक १२ येथे बालाजी ट्रेडर्ससमोरील होलसेल फटाका स्टॉलजवळ घडली.

फिर्यादी आणि त्यांचा भाऊ अमित अधिक साळुंखे (वय २८ वर्षे) हे दोघे त्यांच्या फटाका स्टॉलसमोर बसले होते. त्यावेळी पल्सर मोटारसायकलवरून सहा आरोपी तेथे आले. काही वेळापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपींनी फिर्यादीच्या भावाच्या छातीवर हाताने ठोशांनी आणि लाथांनी मारहाण केली. तसेच आरोपी प्रतिक हळकवडे याने फिर्यादीच्या तोंडावर जोराने हाताने कड्याने मारहाण केल्याने फिर्यादीच्या तोंडातील वरचा एक दात पडला आणि ते जखमी झाले.

याशिवाय आरोपी प्रदीप कळसे याने फिर्यादीचा ॲपल कंपनीचा मोबाईल जमिनीवर जोरात आपटून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांत तक्रार केल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकीही देण्यात आली.

तसेच आरोपी प्रदीप कळसे याने मोठा दगड उचलून आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियमातील कलम ३ आणि ७ यांचाही समावेश आहे.

सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories