news
clock

ट्रकची धडक बसून ५० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी, ता. १६ - भरधाव मोटार ट्रकची धडक बसून ५० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रविंद्र पांडुरंग सांगळे असे मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (ता. १४) चिखली येथील संविधान चौकामध्ये घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत, मयत सांगळे यांच्या पत्नीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जितेंद्र रामसंजीवन पटेल (वय ३५ वर्षे, रा. तळेगाव एमआयडीसी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील आहे.

शनिवारी (ता. १४) रविंद्र पांडुरंग सांगळे हे चिखलीतील-संविधान चौकातून त्यांच्या शाईन मोटार सायकलवरुन जात होते. तेव्हा आरोपी पटेल याने त्याच्या ताब्यातील मोटार ट्रक भरधाव वेगाने, बेदारकारपणे चालवून सांगळे यांच्या मोटारसायकला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन सांगळे यांचा  मृत्यू झाला. 

चिखली पोलिसांनी आरोपी ट्रकचालक पटेल याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५, २८१, मोटार वाहन कायदा कलम - १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories