news
clock

बोऱ्हाडेवाडी-मोशी टीपी स्कीमचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे 

पिंपरी, ता. १३ - पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोऱ्हाडेवाडी-मोशी परिसरात नियोजित विकासासाठी नगररचना योजना (TP Scheme) प्रस्तावित केली आहे. प्रशासकीय काळात या प्रस्तावाला जमीन मालकांनी विरोध केला होता. मात्र, आता नगरसेवक आल्यानंतर पुन्हा महापालिकने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.  

सन १९९७ मध्ये महापालिकेची हद्दवाढ झाली त्यावेळी बोऱ्हाडेवाडीचाही समावेश झाला. या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेत (डीपी) क्षेत्रासाठी 'टीपी स्कीम' तयार करण्याचे नियोजन आहे.  बोऱ्हाडेवाडीतील निवासी क्षेत्र वगळून हे नियोजन सुरु आहे, चऱ्होली-मोशी पट्ट्यातील आयटी पार्क आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. हरकती व सूचनांसह त्याचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. 

२६ सप्टेंबर २०२४ च्या प्रशासक तथा महापालिका सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजूर केला होता. त्याची नोंद राज्य सरकारच्या राजपत्रातही झाली आहे. पण, प्रत्यक्ष बाधित क्षेत्र व ७/१२ उताऱ्यावरील क्षेत्रात विसंगती आढळली होती. त्यावर बाधित जमीन मालकांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करणे सरकारला शक्य झाले नाही. आता पुन्हा हा टीपी स्कीमचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी प्रशासनाने ठेवला आहे. लोकप्रतिनिधींची याबाबतची भूमिका उत्सुकतेची आहे.  




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories