news
clock

बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकाची ६५ लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. १६ - रो-हाऊस खरेदी करण्यासाठी एका ग्राहकांने तब्बल ६५ लाख रुपये आरटीजीस पद्धतीने संबंधित बांधकाम व्यावसायिकास दिले. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने त्या ग्राहकाला घरही दिले नाही व त्याची रक्कमही परत न केल्याने ग्राहकाची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. ही घटना किवळे येथे  १७ सप्टेंबर २०२४ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत घडली आहे. बांधकाम व्यावसियाकाविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, कल्पेश वसंत चौधरी (वय ३३ वर्षे, नोकरी, रा. किवळे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या या घटनेमध्ये  वासुदेव गंगाधर गाडेकर (वय ५५ वर्षे, व्यवसाय - रा. पिंपळे सौदागर) व सुशांत वासुदेव गाडेकर (वय २६ वर्षे) हे आरोपी आहेत. 

फिर्यादी व आरोपी यांनी १७ सप्टेंबर २०२४ रोजी नोटरी करारनामा व फेर प्लान मंजुरीसाठी ८ नोव्हेंबर २०२४ सामंजस्य करार केला होता. त्यानुसार फिर्यादी चौधरी यांनी आरोपींच्या खात्यावर ६५,००,०००/- रुपये आर.टी. जी.एस. केले होते. परंतु आरोपींनी सदरचे पैसे स्विकारुन फिर्यादीला आत्तापर्यंत रो-हाऊस दिले नाही व दिलेली रक्कमही परत केलेली नाही. फिर्यादी चौधरी यांनी रो-हाऊस बद्दल व दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली आहे. 

आरोपींविरोधात रविवारी (ता. १५)  भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२),३१८ (४), ३५२,३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories