चऱ्होली खुर्द येथे घरफोडी; १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

चऱ्होली खुर्द येथे घरफोडी; १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास

चऱ्होली खुर्द | ३१ ऑगस्ट २०२६ : घराच्या बाहेरील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून तसेच आतील दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सुमारे १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना चऱ्होली खुर्द येथे घडली. याबाबत संग्राम उज्जैन देवकर वय २६ रा.आळंदी यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी ४.३० ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पद्मावती रोड, पद्मदर्शन पार्क, फेज-१, गल्ली क्रमांक ३, पद्मावती मंदिराच्या पाठीमागे, चऱ्होली खुर्द येथे घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने तसेच हायर कंपनीचा एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून चोरटा पसार झाला. निष्पन्न आरोपी रणजित अशोक भिसे वय ३१ रा. चऱ्होली याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories