news
clock
शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करावेत, माजी नगरसेवक विनोद नढे यांची मागणी

शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करावेत, माजी नगरसेवक विनोद नढे यांची मागणी

शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करावेत, माजी नगरसेवक विनोद नढे यांची मागणी 

पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे सध्या बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करण्याची मागणी विनोद नढे यांनी केली आहे.

निवेदनात नढे यांनी म्हटले आहे की, शहरात महापालिका व स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या अनेक कॅमेरे कार्यरत नसल्याने गुन्हे तपासात अडथळे निर्माण होत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा बंद राहणे म्हणजे शहराची सुरक्षितता धोक्यात आहे. 

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून सर्व कॅमेरे सुरु करावेत.

शहरात एकूण किती सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत आणि किती बंद आहेत?, बंद कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत?, कॅमेऱ्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या ठेकेदाराकडे आहे? संबंधित कंपनीचे नाव काय?, या प्रकल्पासाठी किती निधी खर्च करण्यात आला असून किती रकमेचे वर्क ऑर्डर देण्यात आले आहेत?, ठेकेदाराला आतापर्यंत किती देयके अदा करण्यात आली? त्याचे बिल तपशील काय?, करारातील अटींनुसार देखभाल न झाल्यास कोणती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे? ही माहिती नढे यांनी मागवली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories