चोरट्यांनी चोरी केली, चोरले काय ?, तर... कंडोम, कॅटबरी आणि झंडू बामचे बॉक्स...
पिंपरी, ता. १४ - चाकण परिसरातील खराबवाडी येथे गुरुवारी (ता. १४) पहाटे चोरट्यांनी एक मेडिकल दुकान फोडले आणि चोरले काय ? तर, कंडोम, कॅटबरी आणि झंडू बामचे बॉक्स. ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांनी महागड्या औषधांऐवजी या वेगळ्याच वस्तू चोरल्याने ही चोरी मोठी चर्चेत आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील माही मेडिकलमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड आणि इतर साहित्यासोबतच त्यांनी कंडोम, कॅडबरी आणि झंडू बामचे बॉक्स लंपास केले. पहाटेच्या वेळी शांत वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली.
या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
- पोलिस तपास, Police Investigation, पहाटेची चोरी, Early Morning Theft, शटर फोडणे, Shutter Break-in, रोख व मालमत्ता, Cash and Goods
- बॉक्स चोरी, Box Stolen, सीसीटीव्ही, CCTV, चोरीचा व्हिडिओ, Theft Video, सोशल मिडिया, Social Media,
- चाकण, Chakan, पिंपरी, Pimpri, कंडोम, Condom, कॅडबरी, Cadbury, झंडू बाम, Zandu Balm,
- चोरटा, Thief, चोरी, Theft, मेडिकल दुकान, Medical Shop, खराबवाडी, Kharabwadi,