मैत्रिणीच्या घरातील कपाटातून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी, तरुणीवर गुन्हा दाखल
Feb 28 2026
55
मैत्रिणीच्या घरातील कपाटातून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी, तरुणीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २८ - मैत्रिणीच्या घरातील कपाटातून २ लाख ४१ हजार ४५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध शुक्रवारी (ता. २७) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे.
याबाबत, महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलगी पूजा काटकर हिची मैत्रीण शितल गोटे ही नेहमी त्यांच्या घरी येत असल्याने, तिनेच ही चोरी केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला. आरोपी शितलने फिर्यादी महिलेच्या घरातील कपाटात ठेवलेले ४६.२९ ग्रॅम वजनाचे, सुमारे २ लाख ४१ हजार ४५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लबाडीने चोरुन नेले.
या प्रकरणी आरोपी तरुणीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तरुणीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस तपास करत आहेत.