घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला २४ तासात अटक
वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कामगिरी
पिंपरी, ता. २६ - वाकड पोलिस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी परिसरातीस सीसीटिव्ही फुटेज तपासले असता गुन्हेगार सापडला. पोलिसांनी त्याला ताथवडे येथून २४ तासात अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मुंबई, सातारा, शिरवळ येथेही गुन्हा केल्याचे समोर आले आहे. अटक आरोपीकडून एकूण ४ गुन्ह्यांमधील दोन मोपेड दुचाकी, ३ मोबाईल फोन, मॅकबुक, एअरपोड, चार्जर, डिजीटल गेमींग प्लेस्टेशन, कंट्रोलर, अॅडपटर असा एकूण २,६७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आदिल नुमान खान (वय २५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मुंबईचा आहे.
तपास पथकाने आरोपीचा शोध घेणेकरिता घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण केले. त्यात डेअरी फार्म समोर-ताथवडे येथे चोरीला गेलेल्या अॅक्सेस दुचाकीवर संशयीत आरोपी दिसला. तत्परतेने पोलिसांनी त्याला मंगळवारी (ता. २४) ताब्यात घेतले व त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी चोरल्याचे कबूल केले. अधिक तपासात त्याने मुंबई परिसरात तसेच शिरवळ, सातारा या ठिकाणी अन्य गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपीकडून एकुण ०४ गुन्ह्यांमधील दोन मोपेड दुचाकी, ०३ मोबाईल फोन, मॅकबुक, एअरपोड, चार्जर, डिजीटल गेमींग प्लेस्टेशन, कंट्रोलर, अॅडपटर असा एकुण २,६७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीन आदिल खान याने दाखल गुन्ह्यासह खालीलप्रमाणे गुन्हे केले-
१) वाकड पो.स्टे. गु.र.नं. १४६/२०२६ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३३१ (३), ३०७ (अ)
२) वाकड पो.स्टे. गु.र.नं. १४९/२०२६ भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२)
३) शिरवळ पो.स्टे., सातारा गु.र.नं. ००९७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (४)
४) जुहू पो.स्टे., बृहमुंबई शहर गु.र.नं. ०३४५/२०२६, भारतीय न्याय संहिता २०१३ चे कलम ३०३(२)
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, शशीकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), बसवराज तेली (अप्पर पोलिस आयुक्त), सारंग आव्हाड (अप्पर पोलिस आयुक्त), विशाल गायकवाड (पोलिस उप आयुक्त, परि-२), सुनिल कुन्हाडे (सहा. पोलिस आयुक्त, वाकड विभाग), वाकड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग, किशोर पाटील (पोलिस निरीक्षक (गुन्हे)), सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, पोलिस उप निरीक्षक बिभीषण कन्हेरकर, सहाय्यक पोलिस फौजदार संदीप गवारी, हवालदार वंदु गिरे, साबळे, घाडगे, वडेकर, भुसारे, पोलिस शिपाई तात्यासाहेब शिंदे, झेंडे, कौतेंय खराडे, विक्रम भगत, कांबळे, मांडे व गायके यांनी केली आहे.