news
clock
मोशी येथे कौटुंबिक कारणाने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण, मोबाईल व मंगळसूत्रही हिसकावले

मोशी येथे कौटुंबिक कारणाने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण, मोबाईल व मंगळसूत्रही हिसकावले

मोशी येथे कौटुंबिक कारणाने महिलेला लोखंडी रॉडने मारहाण, मोबाईल व मंगळसूत्रही हिसकावले

पिंपरी, ता. २८ - कौटुंबिक कारणांनी एका महिलेला तिच्या मेहुण्याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. महिलेच्या हातातील मोबाईल व  गळ्यातील २ ग्रॅमचे मंगळसूत्रही तिच्या मेहुण्याने हिसकावून नेले. आळंदी देहू रस्ता-मोशी येथे शुक्रवारी (ता. २७) ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारहाण झालेल्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला या त्यांच्या बहिणी व भाच्यासोबत राहत होत्या. त्यांच्या बहिणीचा पती समाधान रामराव सोनूने (वय ३५, रा. पिंपळनेर,  जि. बुलढाणा) याने “तुम्ही माझ्या पत्नी व मुलाला आधार का देता?” असे म्हणत फिर्यादीच्या पाठीमागून येऊन फिर्यादीच्या दोन्ही पायावर  लोखंडी रॉडने मारले, त्यावेळी फिर्यादी या खाली पडल्या असता आरोपीने पुन्हा लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पायावर पुढील बाजूस मारहाण केल्याने फिर्यादीच्या पायाच्या नडगीचे हाड फॅक्चर झाले. याशिवाय, आरोपीने फिर्यादीच्या हातातील विवो कंपनीचा मोबाईल व गळ्यातील २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र (किंमत प्राप्त नाही) हिसकावून नेले, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

पोलिसांनी आरोपीविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक नाही. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories