मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इलेक्ट्रीक बाईकवरुन विधानभवनात, इंधन बचतीचा नागरीकांना संदेश
पुणे, ता. १४ - आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासूनच आवाहनाची अंमलबजावणी केली आहे. आज बुधवारी (ता. १४) ते स्वतः इलेक्ट्रीक बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार होते. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांचा ताफाही सोबत होता.
काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांना इंधन बचतीबाबत सूचना दिल्या आहेत आणि आज त्यांनी इंधनबचतीची स्वतःपासून सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कालपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरु केला आहे.
मंत्री-अधिकाऱ्यांनी आठड्यातून किमान एकदा मेट्रो किंवा अन्य सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
याबाबत झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्यात आली आहे. ताफ्यातील वाहने निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसतील याची जबाबदारी पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षकांवर सोपवली आहे. मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
- सार्वजनिक वाहने, Public Transport, मेट्रो, Metro, वाहन ताफा, Vehicle Convoy,
- मंत्री आशिष शेलार, Minister Ashish Shelar, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, Deputy CM Eknath Shinde
- , इंधन बचत, Fuel Saving, नागरिकांना संदेश, Message to Citizens,
- विधानभवन, Vidhan Bhavan, इलेक्ट्रीक बाईक, Electric Bike,
- मुख्यमंत्री, Chief Minister, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis,