हडपसरमध्ये सापडलेली बॉम्बसदृश्य वस्तू होती....जिलेटिनच्या कांड्या, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पोलिस व एटीएसकडून तपास सुरु
हडपसरमध्ये सापडलेली बॉम्बसदृश्य वस्तू होती....जिलेटिनच्या कांड्या, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पोलिस व एटीएसकडून तपास सुरु
पुणे, ता. १४ - पुण्यात हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट इमारतीतील रुग्णालयात बुधवारी (ता. १३) रात्री इमारतीच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने घबराट पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक, पोलिस व अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोचून ती वस्तू नाश करण्यासाठी मोकळ्या जागेत नेली. तपासात ही बॉम्बसदृश्य वस्तू म्हणजे जिलेटिनच्या कांड्या होत्या. त्याला ६ ते ७ तासांचा टायमर सेट केला होता. पोलिसांनी त्या कांड्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहे.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या स्थानिक पोलिसांसह एटीएसकडून (Anti-Terrorism Squad) एकत्रित केला जात आहे. आरोपीने जिलेटिनच्या कांड्या कुठून आणि कशा मिळवल्या, असे करण्यामागे नेमका उद्देश काय होता, याबाबतही चौकशी सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
जिलेटिनच्या कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळल्याची घटना १३-१४ मे २०२६ रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.घटनेचे मुख्य तपशील:ठिकाण: हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील एका नामांकित रुग्णालयाजवळील प्रसाधनगृहात ही वस्तू आढळली.वस्तूचे स्वरूप: संशयास्पद वस्तूत जिलेटिनच्या कांड्या होत्या, ज्याला टायमर जोडलेला होता.टायमर: प्राथमिक माहितीनुसार, या वस्तूला ६ ते ७ तासांचा टायमर सेट केलेला होता.कार्यवाही: माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संशयास्पद वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवून ती निकामी करण्यात आली आहे.तपास: पुणे पोलीस, एटीएस (ATS) आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. हा घातपाताचा कट होता का, याचा शोध घेतला जात आहे
बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याचे समजात परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिस व तपास यंत्रणांनी तत्परतेने तपास केला. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. परिसर पूर्णपणे सील करुन कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ दिली नाही. जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर संशयास्पद वस्तू सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली आणि पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आली आणि नागरीकांचा जीव भांडयात पडला.