news
clock

दिघीमध्ये १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी, ता. १६ - दिघी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १५) रात्री घडली आहे. अथर्व विजय देशमुख असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा गंगोत्री हॉस्पिटल परिसरात पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतला. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. 

अथर्वने बराचवेळ प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला तेव्हा अथर्वने गळफास घेतल्याचे दिसले. अथर्वला खाली उतरवून तातडीने जवळच्या गंगोत्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी दिघी पोलीसांनी‌ घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेहाचे शवविच्छेदन केले आहे. अथर्वच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी त्याने आपला मोबाईल फोन फॉरमॅट केल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories