भरधाव स्विफ्ट डिझायरची अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक; दोन जण जखमी!

भरधाव स्विफ्ट डिझायरची अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक; दोन जण जखमी!

दिघी | 16 सप्टेंबर 2026 : आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव मारुती स्विफ्ट डिझायर कारने अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 21 वर्षीय तरुण आणि त्याच्यासोबत असलेली तरुणी जखमी झाली. अपघातात तरुणाच्या दोन्ही पायांच्या नळीला दुखापत झाली, तर तरुणीच्या उजव्या पायाच्या नळीचे हाड फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास बनारस डेअरीसमोर, दत्तनगर, दिघी, पुणे येथे घडली.

या प्रकरणी अथर्व सुनील सारथडे (वय 21, रा. डुडुळगाव, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. रामगाव, ता. दर्यापूर, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी MH 24 AU 9538 क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारवरील चालक असून त्याचे नाव, वय आणि राहण्याचा पत्ता उपलब्ध नाही.

फिर्यादी आणि त्यांची मैत्रीण हे MH 27 EG 8641 क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून जात होते. यावेळी आळंदीकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर संबंधित कारचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे अथर्व यांच्या दोन्ही पायांच्या नळीला दुखापत झाली तर तरुणीच्या उजव्या पायाच्या नळीचे हाड फ्रॅक्चर झाले.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories