महाळुंगे | 16 सप्टेंबर 2026 : मित्रांसोबत थांबलेल्या 23 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यासाठी सात जण एकत्र आल्याचा आणि त्यापैकी काहींनी फिर्यादी तसेच त्याच्या मित्रावर धारदार हत्याराने वार केल्याचा प्रकार महाळुंगे गावात घडला. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 सप्टेंबर रोजी रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास अक्षय ऑटो गॅरेज, महाळुंगे गाव, ता. मुळशी, जि. पुणे येथे घडली.
या प्रकरणी सुजल देविदास ढमाळ (वय 23, रा. महाळुंगे गाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी अभिषेक चंद्रशेखर कांबळे (सध्या रा. महाळुंगे; मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), उदय गणेश वायकर (रा. सुस), ज्ञानेश्वर अशोक घुले ( रा. पारखे वस्ती, हिंजवडी; मूळ रा. गोविंदपूर, जि. परभणी), अर्जुन बाळासाहेब भाबट (रा. सुस; मूळ रा. हेलस, जि. जालना), करण रावसाहेब पवार (रा. सुसगाव), गणेश भागवत (रा. सुसगाव) आणि अभिषेक ज्ञानेश्वर पुरी अशी आहेत.
घटनेच्या वेळी फिर्यादी मित्र प्रशांत सूर्यवंशी आणि इतर मित्रांसोबत थांबले होते. त्यावेळी आरोपी फिर्यादीला मारहाण करण्यासाठी एकत्र आले. आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना जखमी केले तसेच आरोपी क्रमांक दोन आणि चार यांनी धारदार शस्त्राने फिर्यादीच्या मित्रावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 459/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(1), 189(2), 190 आणि 191(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.