news
clock

दिव्यांग नागरीकांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध - महापौर रवी लांडगे

दिव्यांग भवनाला भेट देऊन तेथील कामकाजाचा घेतला आढावा 

पिंपरी, ता. १७ - ''शहरातील दिव्यांग बंधू-भगिनींचे सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. दिव्यांग नागरिकांचे जीवन अधिक सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी व्हावे यासाठी विविध सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अशा संस्थांच्या सहकार्याने दिव्यांग नागरीकांना दर्जेदार आरोग्य सेवा, पुनर्वसन सुविधा, आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.'' असा विश्वास महापौर रवी लांडगे यांनी दिव्यांग नागरीकांना दिला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग नागरिकांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग भवन फाउंडेशन संस्थेला महापौरांनी नुकतीय भेट दिली व तेथील कामकाजाचा आढावा घेतला. दिव्यांग नागरीकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा, उपचार पद्धती तसेच पुनर्वसन उपक्रमांची महापौरांनी  पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

दिव्यांग बांधवांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा अधिक प्रभावी, सुलभ आणि दर्जेदार पद्धतीने विस्तार व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दिव्यांग नागरिकांना या सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सेवा विस्तारावर विशेष भर द्यावा, असे महापौरांनी सांगितले.  या प्रसंगी दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories