news
clock

'निक्षय मित्र' उपक्रमाद्वारे शहरातील १११ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

पिंपरी, ता. १७ : प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त (टीबी) भारत अभियानांतर्गत 'निक्षय मित्र' उपक्रमाद्वारे शहरातील १११ क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आकुर्डी रुग्णालय व यमुनानगर रुग्णालयात राबविण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 

यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, यमुनानगर रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र मंडपे, शहर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे कर्मचारी गोपाळ कांबळे, चंद्रशेखर सरवदे, अनुराधा चव्हाण, डॉ. गोविंदा नरके, डॉ. हरिदास शेंडे, डॉ. धीरज तायडे, डॉ. विद्याधर फल्ले उपस्थित होते.

शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी नागरिक, सामाजिक संस्था, उद्योग आणि स्वयंसेवी संघटनांनी 'निक्षय मित्र' म्हणून पुढे येत क्षयरुग्णांना सहाय्य करण्याचे आवाहन केले. समाजाच्या सक्रिय सहभागातून क्षयरोगमुक्त भारत हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.  रोहित देवकर यांनी संयोजन केले. 

संस्था व नागरीकांचा पुढाकार महत्त्वाचा.....

क्षयरुग्णांसाठी औषधोपचारांसोबत योग्य पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. 'निक्षय मित्र' उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था व नागरिक पुढे येत असल्याने क्षयरुग्णांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होत आहे. समाजाच्या सहकार्यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास आणि क्षयरोगमुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यास निश्चितच मदत होईल.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories