तीन लाखांच्या मेफेड्रॉनसह ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तरुणाला अटक
Mar 25 2026
66
तीन लाखांच्या मेफेड्रॉनसह ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तरुणाला अटक
पिंपरी, ता. २५ - एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा ३२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाकडून जप्त केला आहे. मेफेड्रॉनसह एक कार, दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २४) वाकड येथील विनोदेवस्ती परिसरात करण्यात आली.
आरोपी अतुल शंकर बालगुडे (वय ३५ वर्षे, रा. पाथरगाव, कामशेत, ता. मावळ) हा अटकेत आहे. आरोपीने एकूण ३,२०,०००/-रु किंमतीचे एकूण ३२ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), २०,०००/- किंमतीचे २ मोबाईल आणि ४२००/- रोख रक्कम बाळगली होती. तीन लाखांची चारचाकी कारही त्याच्याकडे होती. एकूण ६,४४,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीला अटक केली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. २४) एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.