news
clock
भाटनगर येथे ८९ हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

भाटनगर येथे ८९ हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

भाटनगर येथे ८९ हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल  

पिंपरी, ता. १८ -  पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (ता. १७) एका महिलेकडून ८९ हजार ६०० रुपयांचा १५९२ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.  भाटनगर येथे सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत तिच्या साथीदार अन्य दोन महिलाही आढळल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ८९,६००/- रुपये किंमतीच्या गांजा महिलेने अनधिकृतरीत्या विक्रीसाठी बाळगला होता. या महिलेकडे काही मोबाईलही सापडले आहेत. चौकशीमध्ये हा गांजा एका महिलेने दुसरीला विक्रीसाठी सांगितले होते.

या तीन महिला आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिस तपास करत आहेत. 

---------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories