चाकणमध्ये २५ हजार रुपयांचा गांजा युवकाकडून जप्त
पिंपरी, ता. २६ : चाकण परिसरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई करताना गांजा बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकाला पोलिसांनी बुधवारी (ता. २६) अटक केली आहे. ही कारवाई सायंकाळी सुमारे ५.४० वाजण्याच्या सुमारास चाकण गावात माणिक चौक ते पानसरे मळा मार्गावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा नारायण सिंग (वय २०, रा. वासली फाटा, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यातून ०.५३९ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत २५ हजार रुपये आहे. आरोपी हा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मूळचा मध्यप्रदेशातील आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.