रमजान ईदनिमित्त २१ मार्चला चाफेकर चौक-चिंचवड परिसरातील वाहतुकीत बदल
पिंपरी, ता. १८ - रमजान ईदनिमित्त २१ मार्चला, शनिवारी चाफेकर चौक-चिंचवड येथील ईदगाह मैदानामध्ये नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीक येत असल्याने ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतुक पर्यायी रस्त्याने वळवली जाणार आहे. याबाबत आदेश पिपंरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार, २१ मार्चला (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार) सकाळी ५ ते रात्री १ दरम्यान ईदगाह मैदान-चाफेकर चौक-चिंचवड परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. हा बदल वाहतुक सुरळीत होईपर्यंत लागू असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळली जातील. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
निगडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीतील बदल असे.....
- मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १ - एस के एफ कंपनीकडुन डाये बाजुस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
पर्यायी मार्ग २- मरीआई माता मंदिरापासून उजवे बाजूस वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटलमार्गे इच्छितस्थळी जातील.
- चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक जुना जकात नाका कडुन उजवे बाजुस वळुन सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २:- चाफेकर चौक कडुन उजवे बाजुस वळुन अंहिसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
- मोरया नगर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारचे वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: हनुमान मंदीर पासुन उजवे बाजूस वळून सेव्हर ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छितस्थळी जातील.