news
clock
गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण, बाजारपेठा गर्दीने फुलल्या

गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण, बाजारपेठा गर्दीने फुलल्या

गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण, बाजारपेठा गर्दीने फुलल्या

पुणे, ता. १८  - उद्या, गुरुवारी (ता. १९) गुढीपाडवा अर्थातच मराठी नवीन वर्ष सुरु होत आहेत. घरोघरी गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्य पसरले आहे. रंगीत साखरगाठी,  फुलांच्या माळा, तोरणे, कडुनिंबाची डहाळी, गुढीला लावण्यासाठी नवीन साडी, रांगोळी, पूजासाहित्य...या वस्तू घेण्यासाठी रविवारपासून सर्वत्र उत्साह दिसत होता. बुधवारी सकाळपासूनच गुढीपाडव्याच्या तयारीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. 

घरोघरी गुढीपाडवा गुढी उभारुन पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. पण, अनेकांना सुट्टी नसते त्यामुळे पारंपरिक पद्धतीने गुढी उभारता येत नाही, म्हणूनच पूजेसाठी सुंदरशा देवघरात मावतील अशा छोट्या गुढीदेखील नागरीक खरेदी करत होते. खास गुढीला लावण्यासाठी नवीन साडीची खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होती. साखरगाठी लक्ष वेधून घेत होत्या.  मिठाईची दुकाने ग्राहकांनी फुलली होती. कडुनिंबाची डहाळी मिळवण्यासाठीही नागरीकांची लगबग सुरु होती. 

कधी उभारायची गुढी....

गुढी उभारण्यासाठी मुहूर्त नाही. तरी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनंतर गुढी उभी करावी आणि  सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories