दोन लाख रुपये घेऊन दिली नकली सोन्याची माळ; आळंदीत तिघांवर गुन्हा

दोन लाख रुपये घेऊन दिली नकली सोन्याची माळ; आळंदीत तिघांवर गुन्हा

आळंदी | 12 सप्टेंबर 2026 : आई आजारी असल्याचे सांगून सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये घेण्यात आले. त्या मोबदल्यात दिलेली माळ नकली असल्याचे समोर आल्यानंतर तिघांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11.44 ते दुपारी 12 या वेळेत इंद्रायणी नदीवरील पुलावर, आळंदी घाट परिसरात घडली. विक्रांत बबन शेंडगे (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयकुमार, त्याची आई आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीला विश्वासात घेतले. विजयकुमारच्या आईची प्रकृती खराब असल्याचे सांगून उपचारांसाठी पैशांची आवश्यकता असल्याचे भासविण्यात आले.

आरोपींनी सोन्याचे दागिने तारण म्हणून देत असल्याचे सांगून फिर्यादीकडून रोख दोन लाख रुपये घेतले. त्याबदल्यात दिलेली दागिन्यांची माळ खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी विजयकुमार (वय अंदाजे 27), त्याची आई आणि एका अनोळखी साथीदाराविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 429/2026 नोंदविण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories