news
clock
महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु नाही, महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु नाही, महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

 महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु नाही, महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

समाजमाध्यमांवरील माहितीद्वारे होणाऱ्या फसवणूकीपासून सावध राहण्याचे तरुणांना आवाहन 

पिंपरी, ता. २५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदासाठी भरतीप्रक्रिया सुरु नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कारण, समाजमाध्यमांवर महापालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असल्याची खोटी कमाहिती प्रसारित  केली जात आहे व महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्धही केली जात आहे. अशा खोट्या माहितीपासून तरुणांनी सतर्क राहावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, महापालिकेकडून सध्या कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु नसताना काही व्यक्तींनी महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तिपत्रे तयार केली आहेत. या पत्रांमध्ये उमेदवारांची निवड झाल्याचे नमूद करत नियुक्तीची तारीखही १ एप्रिल २०२६ दिली आहे. या पत्रात १६ हजार रुपये पगार आणि १६ हजार रुपये महागाई भत्ता असा उल्लेख करून तीन महिन्यांचा चाचणी कालावधी असल्याचे म्हटले आहे तसेच रुजू होताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल, ही नियुक्ती कायमस्वरुपी असून, महापालिकेच्या सेवा नियमावलीच्या अधीन राहील, असेही या पत्रात सांगितले आहे. 

''फसवणूक झालेल्या तरुणांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच मिळालेल्या माहितीची खातरजमा करावी. फसवणुकीपासून तरुणांनी सावध राहावे.,'' असे आवाहन प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories