news
clock
शिवजयंतीनिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर युवकांनी राबवली स्वच्छता मोहिम, २ हजार पाण्याच्या बाटल्या संकलित

शिवजयंतीनिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर युवकांनी राबवली स्वच्छता मोहिम, २ हजार पाण्याच्या बाटल्या संकलित

शिवजयंतीनिमित्त घोरावडेश्वर डोंगरावर युवकांनी राबवली स्वच्छता मोहिम, २ हजार पाण्याच्या बाटल्या संकलित

पिंपरी, ता. २० शिवजयंतीचे औचित्य साधून घोरावडेश्वर डोंगरावर तेथील युवकांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवले. या अभियानात सुमारे दोन हजार पेक्षा अधिक प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा केल्या. 

घोरावडेश्वर डोंगरावर सातत्याने नागरीक येत असतात.  यंदा महाशिवरात्री निमित्त भाविकांनी घोरावडेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, दर्शनानंतर डोंगर परिसरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे व इतर कचरा सर्वत्र पसरला होता. त्यामुळे जागरुकतेने स्थानिक युवकांनी शिवजयंती निमित्ताने गुरुवारी (ता. १९) स्वच्छता मोहीम राबवली. 

या मोहिमेत रवि मनकर व मणेश म्हस्के यांच्या सहकार्याने प्लॅस्टिक कचरा संकलित करण्यात आला.  स्वयंसेवकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. डोंगरमाथ्यावर आणि पायवाटांवर विखुरलेला कचरा स्वयंसेवकांना गोळा केला. घोरावडेश्वर डोंगरावर काही संस्थांनी वृक्षारोपण केले असून या संस्था सातत्याने डोंगरावर देखभाल करत असतात. हा डोंगर हिरवाईने नटलेला व स्वच्छ सुंदर राहावा यासाठी स्थानिक नागरीकही जागरुक असतात. घोरावडेश्वर डोंगरावर कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी नागरीकांची मागणी आहे.

या मोहिमेनंतर युवकांनी डोंगरावर येणाऱ्या नागरीकांना आवाहन केले आहे की, ''देवदर्शनास येताना श्रद्धेसोबत स्वच्छतेची जबाबदारीही पार पाडावी. शक्यतो प्लॅस्टिकचा वापर टाळून स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या व कापडी पिशव्या वापराव्यात. प्लॅस्टिक साहित्य सोबत आणलेच तर ते डोंगरावर किंवा परिसरात न टाकता कचराकुंडीत टाकावे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories