news
clock
हिंजवडी येथे १ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त, आरोपी अटक

हिंजवडी येथे १ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त, आरोपी अटक

हिंजवडी येथे १ लाख ६२ हजारांचा गांजा जप्त, आरोपी अटक

पिंपरी, ता. २८ - ढवळेनगर-येळवंडेवस्ती-हिंजवडी येथे १ लाख ६२ हजार ६५० रुपयांचा आणि एकूण २.८११ किलो ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) जप्त केला आहे. हा गांजा बाळगणाऱ्या ५० वर्षीय इसमास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. 

ढवळेनगर-येळवंडेवस्ती-हिंजवडी येथे मोकळ्या जागेत शुक्रवारी (ता. २७) आरोपी विकास दत्तात्रय बोत्रे (वय ५० वर्षे, रा. येळवंडे वस्ती-हिंजवडी) याने १ लाख ६२ हजार ६५० रुपयांचा व एकूण २.८११ कि.ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगला होता. 

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे व त्याच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories