news
clock
चिखलीत गांजासह तरुण अटक, एक फरार

चिखलीत गांजासह तरुण अटक, एक फरार

चिखलीत गांजासह तरुण अटक, एक फरार

पिंपरी, ता. २७ - चिखली परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत २१० ग्रॅम गांजासह एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (ता. २५) सायंकाळी सुमारे ५.३५ वाजता जाधववाडी-चिखली येथे करण्यात आली.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून २६ मार्च रोजी पहाटे १२.४५ वाजता गुन्ह्याची नोंद झाली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश धनाजी गोरे (वय १९, रा. गणेशनगर, जाधववाडी, चिखली) असे आहे. त्याच्याकडून सुमारे १०,५०० रुपये किमतीचा २१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

पोलीस चौकशीत आरोपीने हा गांजा सिध्दार्थ तायडे (रा. अजिंठानगर, निगडी) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories