news
clock

भाडेदरावरुन रॅपिडो कारचालक व ग्राहकामध्ये वाद, ग्राहकाला घेतला चावा

पिंपरी, ता. १८ - रॅपिडो कारचालकाशी भाडेदरावरुन झालेल्या वादात कारचालकाने ग्राहकाच्या हाताच्या बोटांना जोरदा चावा घेतला, त्यामुळे ग्राहकाची करंगळी अक्षरशः अर्धी तुटली आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) हिंजवडी येथील ब्ल्यूरीज सोसायटीजवळ रस्त्यावर घडली. रॅपिडो कारचालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत, अनुराग भगत (वय ४२ वर्षे, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी रॅपिडोचालक संदीप दगडू काळे (वय ३० वर्षे, रा. धायरी) हा अटकेत आहे. फिर्यादी भगत यांनी १६ मार्चला नानापेठ येथे जाण्यासाठी ऑनलाईन रॅपीडो अॅपद्वारे चारचाकी गाडी बुक केली.  आरोपी संदीप हा चारचाकी गाडी घेऊन हिंजवडी येथे आला. फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये गाडी भाडेदरावरुन वाद झाला.  आरोपी संदीपने  फिर्यादी भगत यांना शिवीगाळ करुन हाताने मारहान केली. तसेच भगत यांच्या डाव्या हाताला चावा घेतला, यात त्यांची अर्धी तुटली आहे. 

कारचालक आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११७ (२),११७ (३),११५(२),३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories