news
clock
शहरातील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवाव्यात, हाऊसिंग सोसायटी संघटनेची महापौरांकडे मागणी

पिंपरी, ता. १८ - ''पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक व गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावत असलेल्या विविध नागरी समस्या सोडवाव्यात.''अशी मागणी पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या वतीने महापौर रवी लांडगे यांच्याकडे करण्यात आली. 

याबाबत, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच महापौर लांडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.  बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग, पाणीपुरवठा व पंपिंग विभाग, स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग तसेच या सर्व प्रमुख विभागांशी संबंधित प्रश्नांवर महापौरांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी संघटनेने केली. त्यावर, २० फेब्रुवारीपर्यंत विविध विभागांच्या बैठकीची निश्चित  करण्यात येईल व त्यानुसार संबंधित विभागप्रमुख व प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक होईल, असा विश्वास दिला. संघटनेचे महापौरांनी कौतुक केले. 

यावेळी, संघटनेने महापौरांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  महापौरांनी सुरु केलेल्या “फुलांचा गुच्छ नको, गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके व पेन द्या” या उपक्रमाला पाठींबा देत संघटनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके व पेन देण्यात आले. 

यावेळी संघटनचे अध्यक्ष सत्यब्रत त्रिपाठी, सचिव प्रकाश जुकांतवार, वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश उडाणे, वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज सिंग, अविनाश खेमिनार, रोहन देशपांडे तसेच प्रणव खैरनार उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories