'लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज'च्या वतीने गरजूंना अन्नधान्य जागा
पिंपरी, ता. ५ - 'लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज'च्या वतीने शहरातील गरजू कुटुंबे व निराधार महिलांना अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण २० कुटुंबांना प्रत्येकी पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी महिनाभर पुरेल असे रेशन किट वितरित करण्यात आले. या रेशन किटमध्ये जीवनावश्यक अन्नधान्यासोबतच रमजानच्या पार्श्वभूमीवर शीरखुर्म्यासाठी आवश्यक साहित्यही देण्यात आले.
क्लबच्या अध्यक्षा सुरैय्या वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली रंजना पुट्टोल, लायन प्रीती, सुधीर कदम, एमजेएफ अमीन वाडीवाला यांच्या उपस्थितीत रेशन किट वितरण करण्यात आले. गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी लोणावळा सुप्रीमोजची टीम नेहमीच तत्पर असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.